शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा, पुष्कर जोगच्या आई विरोधात गुन्हा दाखल

पुणे: जोग एज्युकेशन ट्रस्टने ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे

: मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता पुष्कर जोग याच्या आईच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. पुण्यातील प्रसिद्ध ‘जोग एज्युकेशन ट्रस्ट’च्या संचालिका सुरेखा जोग यांच्यावर पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जोग एज्युकेशन ट्रस्टने ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षांसह तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि चौघांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार, वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेवडे, हेमंत सावळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते मे २०२२ या कालावधीत घडला आहे.

बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून संस्थेवर प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी; तसेच ‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रस्तावासोबत खोटी स्वमान्यता प्रमाणपत्रे जोडली आहेत.

तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना प्रत्येक मान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार याप्रमाणे ११ शाळांसाठी दोन लाख ७५ हजार रुपये जानेवारी २०२०मध्येच दिल्याचे म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील खेडेकर तपास करीत आहेत.

अशी घडली घटना

आरोपींनी संगनमताने जोग एज्युकेशन ट्रस्ट या संस्थेच्या ११ शाळांची एप्रिल २०१९ ते मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी खोटी व बनावट स्वमान्यता प्रमाणपत्रे तयार केली.

त्यावर खोट्या स्वाक्षरी तसेच बनावट जावक क्रमांकाची नोंद करून ही कागदपत्रे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक यांच्याकडे मान्यतेसाठी सादर केली. याशिवाय आरटीईद्वारे आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून देण्यात येणाऱ्या प्रवेशाच्या शुल्काच्या परताव्यासाठी मुख्याध्यापकांद्वारे प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांच्याकडे ऑनलाइन पद्धतीने कागदपत्रे सादर केली.

काय आहे नेमकं प्रकरण?

जोग एज्युकेशन ट्रस्टने ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षांसह तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि चौघांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार, वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेवडे, हेमंत सावळकर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी विस्तार अधिकारी किसन दत्तोबा भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०१९ ते मे २०२२ या कालावधीत घडला आहे. बनावट स्वमान्यता प्रमाणपत्र तयार करून संस्थेवर प्रशासक नियुक्ती टाळण्यासाठी; तसेच ‘आरटीई’अंतर्गत मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्क परताव्याचा लाभ मिळविण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रस्तावासोबत खोटी स्वमान्यता प्रमाणपत्रे जोडली आहेत.

तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार यांना प्रत्येक मान्यता प्रमाणपत्रासाठी २५ हजार याप्रमाणे ११ शाळांसाठी दोन लाख ७५ हजार रुपये जानेवारी २०२०मध्येच दिल्याचे म्हटले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुनील खेडेकर तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here