कर्जत तालुक्यातील शिंदे येथे उत्खनन करत असताना शंभर वर्षापूर्वीचे धातूचे नाणे सापडले.

कर्जत तालुक्यातील शिंदे येथे जेसीबीने जुन्या घराचे उत्खनन करत असताना शंभर वर्षापूर्वीचे धातूचे नाणे आढळून आले. गावातील सुरेशशेठ हरकचंद भंडारी यांच्या जुन्या वाड्याचे उत्खनन सुरू होते. यावेळी जेसीबी चालक व कामगार यांना ही नाणी आढळून आली.

यावरून गावात गुप्तधन सापडल्याची चर्चा पसरली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांना दिली त्यानंतर त्याठिकाणी पोलिस व महसूल विभागाचे सर्व कर्मचारी यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. त्या ठिकाणी एक छोटी चरवी आढळून आली.

त्यामध्ये १९१८,१९१९ मधील भारतीय चलनातील पाच नाणी आढळून आली. वास्तविक पाहता याठिकाणी अवघे शंभर वर्षांपूर्वीची अवघी पाच साधी नाणी सापडली आहेत. मात्र खोदकाम करताना जेसीपी चालकाला व त्या ठिकाणच्या कामगारांना यापेक्षा मोठे घबाड सापडले यासह अफवांना उधाण आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here