जिल्हा न्यायालय च्या आवरामध्ये पेटवून घेतल्या युवकाचा उपचारादम्यान मृत्यु.
तीन जणां वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा.
अहमनगर :नगर येथील जिल्हा न्यायालाच्या आवारामध्ये स्वतः च्या अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेतलेल्या ऋषिकेश विठ्ठल डव्हाण (वय १८ रा.बाभुळगाव ता. राहुरी) या युवकाची उपचारादरम्यान शनिवारी प्राणज्योत मावळली.
आपल्या मुलास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी फिर्याद मयत ऋषिकेशचे वडील विठ्ठल नामदेव डव्हाण. यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सदर च्या फिर्यादीवरून भारत लाहानू थोरात,अण्णा नबाजी थोरात ,उज्ज्वला शरद थोरात रा.बाभुळगाव ता. राहुरी यांच्यावर राहूरी पोलिसात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला.











