आधारकार्डचा जथ्था खिशात ठेवलेला मृतदेह, नऊ महिन्यांनी रहस्य उलगडले

महाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने गेल्या काही महिन्यात दिसून येत आहे. बीड इथे अशीच एक घटना उघडकीस आली असून एका विवाहित महिलेने चक्क तीन प्रियकरांच्या मदतीने आपल्या पतीचा खून केल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु आहे.

उपलब्ध माहितीनुसार, बीडमध्ये अनैतिक संबंधासाठी पत्नीसह सख्खा पुतण्या, भाचा आणि अन्य एकाने विवाहितेच्या पतीचा खुनाचा कट रचला. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच तीन प्रियकरांच्या मदतीने नवऱ्याचा आधी खून केला आणि त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. तब्बल ९ महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची पाळेमुळे खणून काढली आहेत.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील बाभळगाव इथले दिगंबर गाडेकर हे सप्टेंबर २०२१ पासून गायब होते. पोलिसात सदर नोंद देण्यात आल्यावर ११ मे रोजी शेलगाव थडी शिवारात एका विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा कंबरेखालचा भाग आढळून आला. अर्धवट असेल्या मृतदेहाच्या खिशात काही महिलांचे आधारकार्ड आढळून आले आणि त्यावरून पोलिसांनी संबंधित महिलांशी चर्चा केली असता त्यांनी आधारकार्ड दिगंबर गाडेकर यांना दिले असल्याची माहिती समोर आली आणि हा मयत व्यक्ती दिगंबर गाडेकरच आहे यावर पोलिसांचे शिक्कामोर्तब झाले.

तपास सुरु झाला असताना गाडेकर यांच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबधाचा अँगल समोर आला आणि गाडेकर यांचा पुतण्या गणेश गाडेकर, भाचा सोपान मोरे आणि बाबासाहेब घोगाने या तिघांनी मिळून त्यांचा खून केला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. सदर तीनही जणांचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे पती अडसर ठरत असल्याने हा कट रचल्याचं त्यांनी पोलिसांत कबूल केलं आहे तर पत्नी मात्र फरार झाली आहे . गाडेकर यांचा अर्धा मृतदेह कुठे आहे ? याचा तपास सुरु असून पत्नीलाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.

आधारकार्डचा जथ्था खिशात ठेवलेला मृतदेह, नऊ महिन्यांनी रहस्य उलगडलेमहाराष्ट्रात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने गेल्या काही महिन्यात दिसून येत आहे. बीड इथे अशीच एक घटना उघडकीस आली असून एका विवाहित महिलेने चक्क तीन प्रियकरांच्या मदतीने आपल्या पतीचा खून केल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. सदर घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरु आहे. उपलब्ध माहितीनुसार, बीडमध्ये अनैतिक संबंधासाठी पत्नीसह सख्खा पुतण्या, भाचा आणि अन्य एकाने विवाहितेच्या पतीचा खुनाचा कट रचला. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी पत्नीनेच तीन प्रियकरांच्या मदतीने नवऱ्याचा आधी खून केला आणि त्याच्या शरीराचे दोन तुकडे करून वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. तब्बल ९ महिन्यानंतर पोलिसांनी या प्रकाराची पाळेमुळे खणून काढली आहेत. बीडच्या माजलगाव तालुक्यातील बाभळगाव इथले दिगंबर गाडेकर हे सप्टेंबर २०२१ पासून गायब होते. पोलिसात सदर नोंद देण्यात आल्यावर ११ मे रोजी शेलगाव थडी शिवारात एका विहिरीत एका अज्ञात व्यक्तीचा कंबरेखालचा भाग आढळून आला. अर्धवट असेल्या मृतदेहाच्या खिशात काही महिलांचे आधारकार्ड आढळून आले आणि त्यावरून पोलिसांनी संबंधित महिलांशी चर्चा केली असता त्यांनी आधारकार्ड दिगंबर गाडेकर यांना दिले असल्याची माहिती समोर आली आणि हा मयत व्यक्ती दिगंबर गाडेकरच आहे यावर पोलिसांचे शिक्कामोर्तब झाले. तपास सुरु झाला असताना गाडेकर यांच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबधाचा अँगल समोर आला आणि गाडेकर यांचा पुतण्या गणेश गाडेकर, भाचा सोपान मोरे आणि बाबासाहेब घोगाने या तिघांनी मिळून त्यांचा खून केला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली. सदर तीनही जणांचे मयताच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते त्यामुळे पती अडसर ठरत असल्याने हा कट रचल्याचं त्यांनी पोलिसांत कबूल केलं आहे तर पत्नी मात्र फरार झाली आहे . गाडेकर यांचा अर्धा मृतदेह कुठे आहे ? याचा तपास सुरु असून पत्नीलाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here