दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची घटना घडली

509
  • अहमदनगर hशहरातील चितळे रोडवर असणार्‍या दर्ग्याच्या दरवाजाला हिंदुराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांने भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची घटना घडली आहे. आरोपीने दर्ग्यामध्ये भगवी शाल टाकून भिंतीवर ‘ओम नमो: आदेश’ असा मजकूर लिहिला आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात पोना. तनवीर शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • सचिन नंदकुमार पळशीकर (रा. भराडगल्ली, चितळे रोड, अहमदनगर) असे गुन्हा केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी पळशीकर हा हिंदुराष्ट्र सेनेचा कार्यकर्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीने नेमके कोणत्या कारणाने हा गुन्हा केला, याची माहिती समजू शकली नाही.
  • शुक्रवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान पोना. तनवीर शेख आणि पोहेकॉ. अजय गव्हाणे तोफखाना पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी चितळे रोडवरील दर्ग्याच्या गेटला भगवा रंग देऊन त्यामागे नाथांचा फोटो लावल्याची माहिती पोना. शेख यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे शेख घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली असता तेथे असलेल्या पांढर्‍या रंगाच्या छोट्या दर्ग्याच्या दरवाजाला भगवा रंग देऊन नाथांचा फोटो लावल्याचे निदर्शनास आले. तसेच दग्यार्र्च्या आतमध्ये भगवी शाल टाकून भिंतीवर ‘ओम नमो: आदेश’ असा मजकूर लिहल्याचे आढळून आले. आरोपी सचिन पळशीकर याने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सचिन पळशीकर याला तोफखाना पोलिसांनी अटक केली. आरोपी पळशीकरविरूद्ध भादंवि. कलम 295 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • तोफखाना पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुजावर, नितीन रणदिवे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपनिरीक्षक समाधान सोळंके यांनी पथकासह घटनास्थळी दाखल होत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू दिला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here