Breaking : राज ठाकरेंना चॅलेंज! उत्तर भारतीयांची माफी मागा, अन्यथा अयोध्येत… ; बृजभूषण यांचा इशारा

637

Brijbhushan Singh On Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरत अयोध्या दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अन्यथा त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा बृजभूषण यांनी दिला आहे. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध दर्शवत स्थानिक साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीत रॅली काढली.

‘राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी’यावेळी बृजभूषण यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत म्हटलं आहे की, ‘राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांवर केलेला अत्याचार आम्ही विसरणार नाही. साधूसंतांनी राज ठाकरेंना माफ केलं तरच राज यांनी अयोध्येत प्रवेश देण्याबद्दल विचार करू. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. साधूसंत आणि अयोध्यावासी राज ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी.’

राज ठाकरेंवर टीकास्त्र डागतं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे की, आधी उत्तर भारतीयांवर अन्याय करायचा आणि नंतर अचानक राम भक्त बनायचं, हे जनतेच्याही लक्षात येत आहे. अयोध्येतील जनता राज ठाकरेंवर नाराज आहे. साधूसंतांनी राज ठाकरेंवर रोष व्यक्त केल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात अपशब्द वापरले होते, असं बृजभूषण यांनी म्हटलं आहे. राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर आहेत.

राज ठाकरेंना बृजभूषण सिंह यांचं चॅलेंज!अयोध्येत राज ठाकरे यांना रोखण्याची तयारी सुरु झालीय. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी आज त्यासाठी बैठक बोलावली. नंदिनीनगर इथे साधुसंत आणि नागरिकांसोबत त्यांनी बैठक घेतली. राज ठाकरेंनी 5 जूनला अयोध्येत जाण्याचं जाहीर केलंय. मनसेनं या दौऱ्याची जोरदार तयारी सुरु केलीय. तर उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतलीय. त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला

महाराष्ट्रात आता राज ठाकरेंची दादागिरी चालणार नाही, असंही बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे. आपल्याला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारवर विश्वास असून कायदा आणि सुव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे.

राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावरमनसे अध्यक्ष राज ठाकरे 5 जून रोजी आपल्या पक्षाच्या नेत्यांसह अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तसेच शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. हे त्यामुळे राज्यातील नेत्यांचे अयोध्या दौरे सध्या चर्चेचा विषय बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here