Ajit Pawar : अजित पवार आडवा आला तरी उचला; शेतकऱ्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्र्यांच्या डीवायएसपींना सूचना

466

Baramati News Update : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) आज बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांच्या काटेवाडी गावात एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमाची सुरुवात आज करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान लोकांनी अजित पवार यांच्यासमोर विविध समस्या सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे अजित पवार यांनी तेथेच जनता दरबार सुरू केला. कार्यक्रमात एका नागरिकाने जागेच्या मोजणीवरून सुरू असलेल्या वादाची तक्रार मांडली. दोन गटात वाद असल्यामुळे समोरचा व्यक्ती ऐकत नाही असे सांगितल्यानंतर अजित पवार संतापलेले पाहायला मिळाले. या तक्रारीनंतर त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डीवाएसपींना आदेश दिला. “यांची एकत्र बैठक घेऊन मेळ बसतोय का पहा. या प्रकरणात अजित पवार आडवा आला तरी त्याला उचला अशा कडक सूचना अजित पवार यांनी यावेळी दिल्या.

बारामतीचे प्रांत अधिकारी दोन टक्के कमिशन घेतात ; भर सभेत शेतकऱ्याची तक्रारसंत तुकाराम महाराज पालखी मार्गात घर गेले आहे. परंतु, त्याचा मोबदला मिळत नसल्याची तक्रार एका नागरिकाने यावेळी केली. त्यावर तोडगा काढण्यासाठी बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना अजित पवार सूचना देत होते. याचदरम्यान, सभेत उपस्थित असलेल्या एका ग्रामस्थाने पालखी मार्गातील नुकसान भरपाई देण्यासाठी प्रांत अधिकारी दादासाहेब कांबळे दोन टक्के कमिशन घेत असल्याची तक्रार केली. भर सभेत असा आरोप झाल्याने उपस्थितांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर अजित पवार यांनी मात्र, कपाळाला हात लावत आश्चर्य व्यक्त केले. त्याचवेळी स्वीय सहाय्यक हनुमंत पाटील यांना संबंधित शेतकऱ्याचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना देखील दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here