राज ठाकरे यांच्या सभेत जोरदार राडा… राज ठाकरेंनी काय सुनावले

346
  • औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर अखेर रविवारी (ता. 1) सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडली.. या सभेसाठी औरंगाबाद पोलिसांनी 15 हजार लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घालून दिली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यापेक्षा किती तरी पटीने लोक आले होते..
  • राज ठाकरे यांचे भाषण सुरु झाल्यानंतर थोड्या वेळातच सभेच्या मागील बाजूस बसलेल्या लोकांमध्ये जाेरदार गोंधळ उडाला.. कोणीतरी पाण्याच्या बाटल्यांची फेकाफेकी केली, कोणीतरी माती उधळल्याने एकच गोंधळ झाला. काही लोकांमध्ये हाणामारी झाल्याचेही समजते.. राज ठाकरे यांनी उपस्थित लाेकांना शांततेचे आवाहन केलं. मात्र, त्यानंतरही हा राडा सुरुच होता..
  • चौरंग करून घरी पाठवेन..
  • लोक ऐकत नसल्याचे पाहून राज ठाकरे यांचा पारा चांगलाच चढला. काही वेळ भाषण थांबवून त्यांनी गोंधळ घालणाऱ्यांना चांगलंच फैलावर घेतलं.. “ही मनसेची सभा आहे, इथं जर गडबड, गोंधळ घातला, तर चौरंग करून घरी पाठवेन..” असा थेट इशारा देतानाच ‘काही टाळकी गडबड करायला आली असतील, तर त्यांना तिथल्या तिथं ठोका..’ असा आदेशच त्यांनी दिला..
  • राज ठाकरे यांनी कडक इशारा देताच, सभेतील गोंधळ शांत झाला.. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपलं भाषण पूर्ण केलं.. त्यानंतर राज ठाकरे यांनी विविध विषयांना हात घालतानाच, सत्ताधारी ठाकरे सरकारवरही जोरदार टीका केली.
  • कोंबडा झाकला, तरी सूर्य उगवतोच..
  • ते म्हणाले, की “खरंतर सभा होणार, नाही होणार.. राज ठाकरेंनी सभा घ्यावी, न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार, नाही मिळणार, असं सुरु होतं.. खरंतर ही गोष्ट का केली, मला अजूनही समजलेलं नाही. मी महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात सभा घेतली, तरी तुम्ही टीव्हीवरुन पाहिलीच असती…”
  • “आता तर यापुढची प्रत्येक सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात घेणार आहे. विदर्भातही जाणार. कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. या सभांना आडकाठी आणून काही होणार नाही. कुठेही बोललो, तरी लोकांपर्यंत पोहोचणार आहेच. कोंबडा झाकून ठेवला, तरी सूर्य उगवतोच..,” असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here