राज ठाकरे पुण्यात; वसंत मोरेंनी शेअर केला इफ्तार पार्टीचा फोटो

1441
  • औरंगाबाद इथल्या बहुचर्चित सभेअगोदर राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते पुण्यातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन औरंगाबादकडे निघणार आहेत. दरम्यान राज यांच्या यशासाठी पुण्यात मंत्रपठणासह धार्मिक विधीही करण्यात आले. पुण्यातल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागतही केलं. दरम्यान, वसंत मोरे मात्र या सगळ्या धामधुमीत कुठेच दिसले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
  • राज ठाकरेंची गुढीपाडवा सभा झाल्यानंतर त्यांनी भोंग्यांविषयी मांडलेल्या भूमिकेनंतर मनसेत मोठी खळबळ झाली होती. पुणे शहराध्यक्षपदी असलेले वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेबद्दल असहमती दर्शवल्यानंतर काही वेळातच मोरे यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं होतं. तेव्हापासून वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा रंगत होत्या. राज ठाकरेंच्या उद्याच्या सभेपूर्वी ते दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले आहेत. त्या धामधुमीदरम्यानही वसंत मोरे कुठेही दिसले नाहीत. मात्र आता मोरे यांनी इफ्तार पार्टीमधला फोटो फेसबुकवरून शेअर केला आहे.
  • आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वसंत मोरे म्हणतात, “माझी छोटी बहीण आणि जनता वसाहत मधील नागरिकांची कोरोना काळात सेवा करत असताना कोरोना होऊन तरुणपणात दगावलेलेले संपूर्ण जनता वसाहातचे कै. हमिदसर यांची पत्नी आणी पर्वती विधानसभा मतदार संघाची महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेची उपविभाग अध्यक्ष नाज हमीद इनामदारही जरा एकटी पडली होती. पोरगी खुप छान काम करते, म्हणून तिच्या एरियात इफ्तार साठी गेलो होतो.खूप खूश झाली, पोरगी गरीब आहे पण स्वत: शिक्षिका संपूर्ण कुटुंब उच्चशिक्षित आहे ” नाज ” भविष्यात या भागाची लोकप्रतिनिधी नक्की होऊ शकेल”
  • राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आल्यानंतर वसंत मोरे मात्र कोणालाही दिसले नाहीत. एरवी राज ठाकरे पुण्यात असल्यावर सर्व पदाधिकारी त्यांच्या दिमतीला असतात. मात्र आज वसंत मोरेंच्या अनुपस्थितीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. ते थेट औरंगाबादलाच उपस्थित राहणार असल्याचं कळतंय. मोरे दोन दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मनसे नेत्यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here