डीवायएसपी संदीप मिटके यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील तीन पोलिसांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

डीवायएसपी संदीप मिटके यांच्यासह अहमदनगर जिल्ह्यातील तीन पोलिसांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

अहमदनगर ३० एप्रिलराहुरी तालुक्यामध्ये एका गुन्हेगाराने काही दिवसांपूर्वी एका कुटुंबास ओलीस ठेऊन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

या गुंडाच्या ताब्यातून या कुटुंबाची सुटका करण्याच्या वेळेस झालेल्या गोळीबार मध्ये डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पायाला गोळी चाटून गेली होती मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून डीवायएसपी संदीप मिटके यांनी शस्त्रधारी सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेऊन पोलीस ठेवलेल्या कुटुंब याची सुटका केली होती

त्यांच्या उत्कृष्ट कर्तव्यनिष्ठेने, निर्भीडपणे आणि शौर्याने महाराष्ट्र पोलीस दलाची गौरवशाली परंपरा कायम राखून असाधारण वीरतेचे व अद्वितीय कर्तव्यपरायणतेचे प्रदर्शन घडविले.

त्यांच्या या प्रशंसनीय स्वरूपाच्या दृश्य व अति उत्तम कार्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले आहे

तसेच अहमदनगर पोलीस दलातील ASI जितेंद्र ढवळे, PN माधुरी तोडमल, PN दीपक घाटकर यांना देखील पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर करण्यात आले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here