राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात.

राज्याच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा मोठा अपघात झाला आहे.. राज ठाकरे यांच्या ताफ्यात मागे असणाऱ्या तीन गाड्या एकमेकांना जोरात धडकल्या.. अहमदनगरहून औरंगाबादला जाताना घोडेगावजवळ आज (ता. 30) दुपारी हा अपघात झाला..दरम्यान, या अपघातात मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे, अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाडीच्या बोनटचं मोठं नुकसान झालंय. या अपघाताबद्दल सविस्तर माहिती मिळू शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here