अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात घडला आहे. अहमदनगर-सोलापूर रस्त्यावर कोकणगाव गावच्या शिवारात बोराडे वस्ती जवळ चार वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या विचित्र अपघातात दोघांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातांमध्ये मालवाहतूक ट्रक हा सोलापूर कडून अहमदनगरकडे जात होता, तर इतर तीन वाहने तीन चाकी अॅपे रिक्षा, क्रुझर कंपनीची जीप आणि टू व्हिलर गाडी ही मिरजगावच्या दिशेने सोलापूरकडे जात होते.या अपघातात कृष्णा मल्हारी बोरुडे आणि सोपान दिनकर काळे या दोघांचा मृत्यू झाला आहे.तर इतर दहा जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत सर्वांना नगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.अहमदनगर- सोलापूर महामार्गावरील कोकणगाव शिवारात काल रात्री 11 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाही. दरम्यान जखमींमध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे. आठ जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात तर सात जणांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत कर्जत पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.हा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबत कर्जत पोलीस तपास करत असल्याचे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले आहे.
ताजी बातमी
ठेकेदाराकडून लाच घेताना पारनेर पंचायत समितीत जि.प.च्या उपअभियंत्यासह तिघे रंगेहात
पारनेर पंचायत समितीत लाचखोरीचा 'ट्रॅप'उपअभियंत्यासह तिघे रंगेहात६५,६०० रुपयांच्या लाच व्यवहारावर एसीबीची कारवाईपारनेर : प्रतिनिधी“बिल काढायचं असेल तर...
मुंबईमध्ये खळबळ, ठाकरे गटाच्या शिवसैनिकाची हत्या, लोखंडी रॉडने डोक्यात वार
मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची निघृण हत्या करण्यात आली आहे. विक्रोळीमध्ये गुरूवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली...
घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर रोखा; दोषींवर कठोर कारवाई करा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया…..
अहिल्यानगर, दि. २१ : घरगुती गॅस सिलेंडरचाअवैधरित्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये होणारा वापर थांबवून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश...
चर्चेत असलेला विषय
Hijab Ban : हिजाब वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान
Hijab Ban Row : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या (Karnataka high court) आदेशाला सर्वोच्च न्यायालयात...
नियंत्रण कक्ष, बस आणि रात्रीचे ऑपरेशन: सुदानमध्ये अडकलेल्या 3,000 हून अधिक लोकांना भारताने कसे...
सुदानच्या सशस्त्र सेना आणि देशाच्या जलद समर्थन दलांमध्ये 15 एप्रिल रोजी खार्तूममध्ये लढाई सुरू असताना, भारतीय दूतावासाने...
भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या काळात असाधारण कामगिरी केली: पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे प्रतिपादन केले की भारताने आपल्या G20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात बहुपक्षीयतेचे पुनरुज्जीवन...
युट्यूबवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १ कोटी सब्सक्राइबर्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूबवर १ कोटी सब्सक्राइबर्स झाले आहेत. हे स्थान मिळविणारे ते जगातील पहिले नेते आहेत. मोदींचे यूट्यूब चॅनल Narendra...





