औरंगाबाद : येथील सातार परिसरात रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाने (Railway Police) अजानच्या वेळी आपल्या घरात मोठमोठ्याने गाणे (song) वाजवल्याचा प्रकार समोर आला आहे. किशोर गंडप्पा मलकुनाईक (फ्लॅट नं. १४, बी विंग) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
परिसरात रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाने (Railway Police) अजानच्या वेळी आपल्या घरात मोठमोठ्याने गाणे (song) वाजवल्याचा प्रकार समोर आला आहे. किशोर गंडप्पा मलकुनाईक (फ्लॅट नं. १४, बी विंग) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी, काही लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. यानंतर सातारा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी स्वत: फिर्यादी होत गुन्हा दाखल केला होता.
किशोर गंडप्पा मलकुनाईक परळीत रेल्वे सुरक्षा बलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते औरंगाबादेत रेल्वे स्टेशन परिसराच्या पाठीमागील भागातील, सिल्कमिल काॅलनीतील अमृतसाई प्लाझा सोसायटीत चौथ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहेत. त्यांच्या इमारतीसमोरच एक मशीदही आहे.
२३ एप्रिलला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास बायकोच्या वाढदिवसानिमित्त मलकुनाईक यांनी आपल्या घरात छाेटेखानी पार्टीचे आयोजन केले होते.घरातील बेडरूममध्ये असलेल्या खिडकीजवळ त्यांनी स्पीकरवर गाणे लावून वातावरण निर्मिती केली होती.
मात्र, याचवेळी मुस्लीम समाजाच्या अजानची वेळ होती. त्यामुळे या गाण्यांचा त्रास होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी पोलिसांना तक्रार केली. यानंतर पोलिसांनी पोलिसांनी मलकुनाईक यांच्या घरी जात पाहणी केली. मुकुलनाईक यांनी गाणे वाजवल्याचे कबूलही केले. पोलिसांनी हा स्पीकर जप्त केला.
तसेच पोलिस हवालदार कारभारी नलावडे यांनी त्यांच्याविरोधात फिर्याद दिली.रेल्वेत पोलिस उपनिरीक्षक या जबाबदार पदावर असताना देखील किशोर मलकुनाईक यांनी पोलिस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केले.
दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करणे, अफवा पसरवणे आणि नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होईल असे वर्तन केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कराळे करत आहेत. या कलमानुसार आरोप निश्चिती झाल्यास ३ वर्षांपर्यंत शिक्षा किंवा आर्थिक दंड अथवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात, असे अॅड. सुदर्शन साळुंके आणि अॅड. अशोक ठाकरे यांनी सांगितले.पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया – घरात पत्नीचा वाढदिवस असल्याने छोट्या ब्लुटूथ स्पीकरवर गाणे सुरू होते. काही मुस्लीम बांधवांनी तक्रार केल्यावर पोलिसांनी समक्ष घरात येऊन केली होती पाहणी. घटनेच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजले. कुणाच्याही भावना दुखविण्याचा उद्देश नाही, अशी प्रतिक्रिया रेल्वेचे उपनिरीक्षक किशोर मलकुनाईक यांनी दिली आहे.









