नगर तालुक्यात हॉटेलमध्ये दारूची अवैध विक्री करणाऱ्यांकडून पोलीस पथकास धक्काबुक्की

नगर तालुक्यात हॉटेलमध्ये दारूची अवैध विक्री करणाऱ्यांकडून पोलीस पथकास धक्काबुक्की

तालुका (प्रतिनिधी) अवैधरित्या दारू विक्री करणार्‍या हॉटेलवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या पथकाला शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की करण्यात आली. रविवारी (दि.१७) रात्री साडेनऊ वाजता खोसपुरी (ता. नगर) गावच्या शिवारात हॉटेल गुडलक येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस शिपाई गजानन एकनाथ गायकवाड (वय 34) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूध्द सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अमोल भरत आव्हाड (वय 29), गोरक्षनाथ ज्ञानदेव आव्हाड (वय 45), निलेश जालिंदर आव्हाड (वय 23 तिघे रा. पांगरमल ता. नगर), नवनाथ गंगाधर मोकाटे (रा. इमामपूर ता. नगर) व एक अनोळखी व्यक्तींविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमोल, गोरक्षनाथ, निलेश या तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दीड हजार रूपयांची दारू जप्त केली आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक हॉटेल गुडलक येथे अवैध दारू विक्रीवर कारवाई करण्यासाठी गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here