Russia Ukraine War : रशियाकडून तेल आयात करून भारत कोणत्याही निर्बंधांचे उल्लंघन करत नसल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्यात झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर अमेरिकेनं हे वक्तव्य केलं आहे. जागतिक आव्हानं, युक्रेन युद्ध आणि इतर अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांची चर्चा झाली. या बैठकीतून एक मोठी बातमी समोर आली आहे की, रशियाकडून तेल आयात करण्याच्या भारताच्या निर्णयाला अमेरिकेनं नियमांचं उल्लंघन मानलं नाही.
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, भारत रशियाकडून तेल आयात करून कोणत्याही निर्बंधांचे उल्लंघन करत नाही. रशिया-युक्रेनमध्ये भारताची भूमिका पाहता अमेरिकेनंही भारतावर कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तेल खरेदीच्या बाबतीत रशियापेक्षा अमेरिका भारतासाठी अधिक फायदेशीर ठरेल, असे समजावण्याचा प्रयत्न अमेरिका करत आहे.
राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, अमेरिका भारताच्या तेल आयातीच्या साधनांमध्ये विविधता आणण्यास मदत करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताला रशियाकडून मिळणाऱ्या तेलापेक्षा अमेरिकेतून होणारी तेलाची आयात भारतासाठी मोठी आणि महत्त्वाची आहे. साकी यांनी माहिती दिली की, ‘रशियातून भारत केवळ 1 ते 2 टक्के आहे. त्याच्या तुलनेनं भारत अमेरिकेतून करत असेलेली तेल आयात 10 टक्के आहे. त्यामुळे हे कोणत्याही प्रकारचं उल्लंघन नाही.”भारताकडून कोणत्याही निर्बंधांचं उल्लंघन नाही’रशियाकडून तेल आयात करण्याच्या भारताच्या हालचालींवर अमेरिकेने केलेल्या विधानाकडे एक मोठा बदल म्हणून पाहिलं जाऊ शकतं. पूर्वी मॉस्कोमधून ऊर्जा आयात वाढवणे भारताच्या हिताचं नसल्याचं म्हटलं होतं. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की हा एक रचनात्मक मुद्दा आहे, मात्र ती एक उत्पादक मुद्दा होता. हे नातं अमेरिका आणि राष्ट्राध्यक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.