- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावाजवळील अहमदनगर – श्रीरामपुर बायपास या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व रुंदीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने त्या परिसरात नेहमीच अपघात होतात. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून आजमितीस या गावातील लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने या रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला रहिवास तसेच व्यापारी दुकाने असल्याने नागरीकांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून जावे लागते या रस्त्यावर नेहमी अवजड गाड्यांची रहदारी चालू असल्यांमुळे रस्त्याच्या कडेला लोकवस्त्या आहेत. दत्तमंदिर आहे भाविक भक्त दर्शनासाठी, लहान मुले, कॉलेज मधले विद्यार्थी जातात-येतात. तेथील लोकांना अपघाताची भिती वाटत होती.
- बऱ्याच दिवसापूर्वी त्या परिसरात अपघात झाला होता. छोटे मोठे अपघात या ठिकाणी होत आहे. अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून बेलापूर येथील गौसे आजम सेवा भावीसंस्था यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपुर यांना निवेदन देण्यात आले होते निवेदनात म्हणले होते की लवकरात लवकर कोल्हार चौक, श्रीरामपुर – अहमदनगर बायपास रोड, दत्तमंदिरा समोर गतिरोधक बसवण्यात यावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता.
- सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपुर यानी बाबी लक्षात घेता गतिरोधक असणे गरजेचे आहे हा विचार करत श्रीरामपुर – अहमदनगर बायपास रोड कोल्हार चौक परिसरात दोन गतिरोधक बसविण्यात आले. बेलापूर येथील गौसे आजम सेवा भावी संस्थेच्या मागणी यश आल्यामुळे गौसे आजम सेवाभावी संस्थेचे संस्थापक – मुख्तार सय्यद व अध्यक्ष – सुलतान शेख यांनी कार्यकर्ते व बेलापुरातील नागरिकच्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभाग श्रीरामपुर यांचे आभार मानले.
Home महाराष्ट्र कोल्हार चौक, श्रीरामपुर – अहमदनगर बायपास रोड, दत्तमंदिरा समोर गतिरोधक बसवण्यात यावे...






