Sharad Pawar meets PM Modi: पवार-मोदी भेटीवर अजित पवार म्हणाले….

455

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (6 एप्रिल) दिल्लीत भेट झाली. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास संसदेतील पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयात दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमी या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त होत आहे.

पवार आणि मोदींच्या भेटीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येत आहे. अजित पवार म्हणाले की, “मी शिर्डी परिसरात आहे. त्यामुळे जोपर्यंत माहिती घेत नाही, तोपर्यंत बोलणं उचित नाही, पण देशाचे पंतप्रधान आणि एका पक्षाचे राष्ट्रीय नेते विकासकामांबाबत भेटू शकतात. काही महत्त्वाचे प्रश्न असतात त्यात चर्चा करावी लागते, तसे काही प्रश्न असू शकतात. दोन्ही मोठे नेते आहेत. त्यांच्यात काय विषय झाला मला माहित नाही.”

दरम्यान दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची ही वन टू वन भेट होती. दोघांमध्येच 20 ते 25 मिनिटं चर्चा झाली. भेटीचा विषय नेमका समजू शकलेला नाही. पण राजकीय चर्चा झाली असणार याच शंका नाही.

पवार-मोदी भेटीची कायम चर्चाशरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते तेव्हा त्याची कायम चर्चा होते. आजच्या भेटीचं टायमिंगही महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी सुरु आहेत. ईडीची कारवाई सुरु आहेत, त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपता आत्मविश्वास दुणावला आहे. या सगळ्या घडामोडींमुळे ही भेट महत्त्वाची ठरते.याआधी या दोन्ही नेत्यांची भेट मागच्या वर्षी 17 जुलै रोजी झाली होती. त्यावेळीही चर्चा रंगली होती. बऱ्याच कालावधीनंतर आजची भेट झाली आहे. मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये दोघांची सहज भेट होत होती. पण दुसऱ्या टर्ममध्ये भेटीचा सिलसिला काहीसा कमी झाला होता. मोदींच्या दुसऱ्या टर्ममधील दोन्ही नेत्यांची ही तिसरी किंवा चौथी भेट असावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here