Ajit Pawar : मी शब्दाचा पक्का, शब्द कधीही फिरवत नाही : अजित पवार

354

Ajit Pawar : मी शब्दाचा पक्का आहे. शब्द कधी फिरवत नाही. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राजकीय, सामाजिक चळवळीत नगर जिल्ह्याच योगदान आहे. 1991 साली लोकसभा निवडणुकीत शंकरराव काळे खासदार झाले, तेव्हा मी ही खासदार झालो. मला 6 महिने कालावधी मिळाला. पी व्ही नरसिंहराव यांनी मला सांगितले की अवसिश्वास ठरवानंतर तू राजिनामा द्यायचा, शरद पवार तुझ्या जागी खासदार होतील हा किस्सा देखील अजित पवार यांनी सांगितला. आता काही लोक भाषण करत समाजात तेढ निर्माण करत आहेत. इतके दिवस काय झोपले होते का? असा सवाल करत अजित पवार यांनी अप्रत्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला.

शंकरराव काळे यांच्या 101 वी जयंतीच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. आम्ही कितीही राज्यभर गप्पा मारत असलो तरी आमचे मतदारसंघ सोडून जात नाही. मात्र, शंकरराव काळे अनेक ठिकाणी निवडून आले असेही ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात असताना राज्य सरकारने अनेक विकासकामे केली असल्याचे अजित पवार म्हणाले. सावकाराच्या दारात जायचे नाही, शुन्य टक्के व्याज दराने पीक कर्ज मिळतील असेही पवार म्हणाले.

आशुतोष काळे यांना विधिमंडळ मध्ये पाठवले, याबाबत तुमचे आभार मानतो असेही अजित पवार म्हणाले. दोन वर्षे कडक निर्बंध होते, त्यामुळे कार्यक्रम घेतले नाहीत. मास्क ऐच्छिक आहेत. बंधनकारक नाही, मात्र आमचे टास्क फोर्स लक्ष ठेवून आहे असेही पवार म्हणाले. कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात ते पुन्हा पूर्ववत आणायचे आहे. अर्थसंकल्पात कुठलाही नवा टॅक्स लावला नाही. रस्ते, विकास कामासाठी निधी राखीव ठेवला आहे. पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे, पाणी वापराचा क्रम जाहीर केला आहे. सर्व विकासकामे करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. मी शब्दाचा पक्का आहे, शब्द कधी फिरवत नाही असेही अजित पवार म्हणाले.आम्ही लाख लाख मतांनी विजयी होतो मात्र यंदा आम्ही कसेबसे निवडून आलो. आम्ही साधू संत नाही, पुडच्या वेळी जास्त मतांनी निवडून आणा असेही अजित पवार म्हणाले. घोडा मैदान दूर नाही, जिल्हा परिषद निवडूक जवळ आहे, तेव्हा दाखवा असेही अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here