वाशिमवरून पन्नास किलोमीटर अंतरावरील शेंदुरजना जंगलात आग लागली. या आगीत पाच एकर जंगल जळाले. विद्यार्थ्यांनी ही आग विझविण्यासाठी मदत केली.

वाशिम जिल्ह्याच्या शेंदुरजना आढाव परिसरातील जंगलाला लागली भीषण आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

ग्रामस्थांच्या मदतीनं आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. जंगली प्राण्यांच्या जीवित्वास झाला धोका निर्माण झाला आहे. तीन तासांनंतर ही आग विझवली. पाच एकर जंगल जळून खाक झालं.

आज दुपारी तीन वाजता आग लागली. वन विभागाचे अधिकारी नव्हते. शेजारी शिबिरात विद्यार्थी होते. ते शेततळ्यांचं खोदकाम करत होते. त्यांनी ही आग विझवली.

संध्याकाळी सहा वाजता ही आग विझविण्यात विद्यार्थ्यांना यश आलं. तोपर्यंत सुमारे पाच एकर जंगलाचं नुकसान झालं. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्यामुळं आगीवर लवकर नियंत्रण आणता आलं. अन्यथा नुकसान मोठ्या प्रमाणात झालं असतं.
