Maharashtra covid restrictions news live : यवतमाळ जिल्ह्यात 24 तसात आगीची तिसरी घटना, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

401

मुंबई : आज गुरूवार 31 मार्च 2022. आज आपण राजकारणासह (Politics) सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर घेणार आहोत. राज्यात आज देखील राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळानं एकमताने हा निर्णय घेतला आहे. आगामी सण उत्साहात साजरे करण्यासाठी महाराष्ट्राला मोकळं केलं आहे. गुढीपाडव्याला शोभायात्रा जोरात काढा, असा संदेश मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेटने महाराष्ट्राला दिला आहे. असंय की ज्या माणसाला मास्क लावावा असं वाटत असेल, तर लावावा. ज्या वाटत असेल की नाही लावावा, त्यांना लावू नये. कुठलंही बंधन आता राहिलेलं नाही, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here