.उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध महिला शिक्षिकेने दाखल केलेली याचिका फेटाळताना हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 25 तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचा हवाला दिला.
औरंगाबाद 30 मार्च : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नांदेड येथील एका कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या दोन आदेशांवर शिक्कामोर्तब केला आहे (HC tells Woman to pay Former Hubby Alimony).
ज्यामध्ये एका महिला शाळेतील शिक्षिकेने तिच्या विभक्त पतीला अंतरिम मासिक 3,000 रुपये पोटगी देण्याचे निर्देश दिले होते.
यासोबतच तिच्या शाळेच्या मुख्याध्यापकांला तिच्या दरमहा पगारातून 5,000 रुपये कापण्यास सांगितले होते. हे पैसे कोर्टात जमा करण्याचे आदेश देण्यात आले, कारण तिने ऑगस्ट 2017 पासून ठरलेली रक्कम पतीला दिलेली नव्हती





