Petrol Diesel Price : एक दिवसाच्या स्थिरतेनंतर पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा कडाडले; जाणून घ्या प्रति लिटरच्या किमती

489

Petrol-Diesel Price Today 25 March 2022 : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांनी सर्वसामान्यांची धाकधुक वाढवली आहे. आज पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Price) प्रत्येकी 83 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर जारी करण्यात आले आहेत. अशाप्रकारे चार दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.40 रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीनंतर देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 पैशांनी वाढले असून डिझेलचे दर 85 रुपये प्रति लिटरनं वधारले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 97.81 रुपये आणि डिझेलचा दर 89.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग अनेक दिवस वाढू शकतात. दरम्यान, जागतिक बाजारपेठांत कच्च्या तेलामुळं भारतातील पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी वक्तव्य केलं आहे. 

देशात गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली होती. 22 आणि 23 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. दरम्यान, 22 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरांत जे बदल करण्यात आले होते ते 137 दिवसांनी करण्यात आले होते. त्यापूर्वी देशात इंधन दर स्थिर होते. आता सलग दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवल्यानंतर आज मात्र देशातील दर स्थिर आहेत.

देशात 4 नोव्हेंबर 2021 पासून ते 21 मार्च 2022 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. पण या दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाली. या काळात कच्च्या तेलाची किंमत ही 82 डॉलरवरुन ती 111 डॉलरवर पोहोचली आहे. त्यामुळे या तीन कंपन्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पाच महिन्यांनंतर 22 आणि 23 मार्चला देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. 

मूडीजने आपल्या अहवालात सांगितलं आहे की, बाजारातील सध्याची स्थिती पाहता पेट्रोलियम वितरण कंपन्यांना पेट्रोलच्या विक्रीवर दररोज 25 डॉलर प्रति बॅरेल आणि डिझेलच्या किंमतीवर 24 डॉलर प्रतिबॅरेल नुकसान होत आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here