‘हिरो’समूहावर प्राप्तिकर विभागाचे छापे; उद्योजक पवन मुंजाळ यांच्या घर आणि कार्यालयाची तपासणी
नवी दिल्ली : कर चोरीच्या संशयावरुन प्राप्तिकर विभागाने आज बुधवारी देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या हिरो मोटोकाॅर्पवर धाडी घातल्या आहेत.
यात हिरो मोटोकाॅर्पचे प्रमुख पवन मुंजाळ यांच्या कार्यालयावर आणि घरावर प्राप्तिकर विभागाच्या टीम दाखल झाल्या आहेत. या वृत्तानंतर हिरो मोटोकाॅर्पच्या शेअरमध्ये घसरण झाली.हिरो मोटोकाॅर्पची ४० देशांमध्ये उत्पादने विक्री होतात.
आतापर्यंत कंपनीने १०० दशलक्ष वाहनांची विक्री केली आहे. भारतात मागील २० वर्षांपासून दुचाकी निमिर्तीत हिरो मोटोकाॅर्पची मक्तेदारी आहे.या वृत्तानंतर हिरो मोटोकाॅर्पच्या शेअरमध्ये ४ टक्के घसरण झाली.व्यक्त केला आहे.
त्यानुसार कंपनीच्या दिल्ली, गुडगांव, हरयाणा, दिल्ली येथील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे तपास पथक आज सकाळीच धडकले. त्यांच्याकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी केली जात असल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे.
दरम्यान या तपासणी मोहीमेबाबत हिरो मोटोकाॅर्पकडून दुजोरा देण्यात आलेला नाही.





