Corona Virus : कोरोनाचा पुन्हा धुमाकूळ! जगभरात चौथ्या लाटेचा उद्रेक

540

Corona Virus : जगभरात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चीन, दक्षिण कोरीया, अमेरीका, ब्रिटन, इटलीसारख्या देशातमोठ्या वेगानं कोरोनाचा फैलाव पुन्हा होताना दिसत आहे. जगातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या कोरोनाच्या व्हेरीयंटमुळे मोठी रुग्णवाढ होत आहे. जगभरात सध्या परिस्थिती बदलत आहे कोरोनाची चौथी लाट अनेक देशात आली असल्याचं चित्रही पाहायला मिळत आहे. 

चीनमधील वुहान शहरात कोरोना विषाणू सर्वात पहिल्यांदा आढळल्यानंतर जगभराला कोरोनाच्या भयंकर लाटेचा सामना करायला लागला. आता पुन्हा चीनच्या काही भागात कोरोना पुन्हा वाढत आहे. चीनच्या जिलिन प्रांतात राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याचं पाहायला मिळालं. काही बाधितांचा मृत्यूही झाला. त्यामुळे दोन कोटी संख्येच्या संपूर्ण जिलिनप्रांतात कडक लाॅकडाऊन लावण्यात आला आहे. दरम्यान चीनमध्ये ज्याप्रकारे कोरोनाची रुग्णवाढ होतेय. त्याचप्रकारे दक्षिण कोरीयात देखील होताना दिसत आहे. दक्षिण कोरीयात एका दिवसातील सर्वाधिक रुग्णवाढ बघायला मिळाली. ज्यात 6 लाख 21 हजार रुग्णसंख्या होती. जी दक्षिण कोरीयाच्या एकूण लोकसंख्येच्या 1.2 टक्के इतकी आहे. दुसरीकडे, अमेरीका, ब्रिटन, जर्मनी, रशियासारख्या देशात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्येत वाढ होते आहे. 

दक्षिण कोरीयात मागील 24 तासांत चार लाख रुग्णसंख्या आढळली आहे. 

ब्रिटनमध्ये एका दिवसात 90 हजार नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद. मागील आठवड्यापेक्षा 24 टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली.

ऑस्ट्रियात रुग्णसंख्या वाढत असल्यानं मास्क घालणं बंधनकारक 

समोआ देशात कम्युनिटी स्प्रेड झाल्याने संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय 

अमेरीकेत मागील 24 तासांत 35 हजार 597 कोरोना रुग्ण 

चीनमध्ये मागील 24 तासांत 3 हजार 844 नव्या कोरोनाबाधितांची नोंद 

जगभरात हा ओमायक्राॅनचा सब-व्हेरीयंट वेगानं पसरतोय. अशात अनेक देशांतून यावर नॉन-टॉलरन्स स्टॅटर्जी वापरतलॉकडाऊनसारखे कठोर निर्णय देखील घेतले जातायत. त्यामुळे पुन्हा एकदा त्या-त्या देशातील अर्थव्यवस्था कासवगतीने पुढे जातानाबघायला मिळत आहे. जगभरात बीए1 आणि बीए2 चा होणारा फैलाव अधिक तीव्र झाला आहे. अशात ह्या नव्या व्हेरीयंटची वेगळी लक्षणं अद्यापहीसमोर आलेली नाही आहेत. मात्र, होणारे मृत्यू देखील चिंतेचा विषय आहे. अशात लसीकरण, आणि कोव्हिड नियमांच्या पालना पुढे काहीही पर्याय नसल्याचं देखील दिसत आहे. अशात आलेला नवा व्हेरीयंट जगावर कसा आघात करतो आणि किती हानी करतो, हे बघणं महत्त्वाचं असेल. 

भारतामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मर्यादित असणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाण सेवा पूर्ण क्षमतेनं सुरू होणार आहेत. केंद्रीय हवाई मंत्रालयाने येत्या 27 मार्च पासून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा पूर्ण क्षमतेन सुरू होणार असल्याचं सांगितल आहे. पण आता जगभरात वाढणाऱ्या रुग्णांमुळे ही विमानसेवा पूर्ण क्षमतेने सुरु होणार का? हे पाहावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here