संदीप मिटके यांच्या पथकाची लॉजवर कारवाई
श्रीरामपूर शहरातील वैभव लॉज येथे असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून दोन पीडित महिलांची सुटका केलेली आहे.उपलब्ध माहितीनुसार, 17 मार्च रोजी पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके श्रीरामपूर विभाग यांना गुप्त सूत्रांच्या माध्यमातून सदर लॉजमध्ये लॉजमालक भगवान विश्वासराव क्षत्रिय ( वय ६८ राहणार वैभव लॉज वॉर्ड नंबर पाच ) हा हाय प्रोफाइल महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार संदीप मिटके यांच्या पथकाने कारवाईसाठी सापळा रचला. श्रीरामपूर शहर आणि अंमलदार यांचे पथक तयार करून वैभव लॉज येथे सुरुवातीला बनावट ग्राहक पाठवण्यात आले त्यानंतर हा प्रकार तिथे सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर शासकीय पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला आणि दोन महिलांची सुटका करण्यात आली. लॉजमालक आणि आणि त्याचा मॅनेजर विश्वास रामप्रसाद खाडे ( वय 26 राहणार कांदा मार्केट शेळके हॉस्पिटल शेजारी श्रीरामपूर ) याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके ,पोलीस इन्स्पेक्टर सानप, सहायक पोलीस इन्स्पेक्टर विठ्ठल पाटील, पो कॉ नितीन शिरसाठ, पो कॉ गौतम लगड, राहुल नरोडे, रमिझ् आत्तार म पो कॉ सरग, गलांडे आदींच्या पथकाने केलेली असून भर लोकवस्तीत सुरु असलेल्या या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये देखील नाराजी होती .