China Corona : चीनमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, चीनमध्ये शिक्षण घेणारे भारतीय विद्यार्थी अडचणीत

    473

    China Corona Update : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता चीनमध्ये कोरोनाचे नवीन कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे चीनमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. भारतीय विद्यार्थ्यांच्या चीनमध्ये परतण्यावर अडचणी आल्या आहेत. चीनच्या नव्या निर्बंधांमुळे भारतीय विद्यार्थ्यांना चीनमध्ये शिक्षणासाठी पुन्हा परतण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चिनी विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना अद्याप ऑफलाइन क्लासेससाठी चीनमध्ये प्रवेश देण्यात आलेला नाही. हा मुद्दा गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयासमोर मांडण्यात आला.

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘चीनच्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या परतण्याचा मुद्दा अनेकदा उपस्थित करण्यात आला आहे. कोरोनाचे निर्बंध लागू झाल्यापासून हा संवाद सुरू आहे. निर्बंध कायम राहिल्याने भारतीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक करिअर धोक्यात येत असल्याची जाणीव चीनला करुन देण्यात आली आहे.’

    त्यांनी पुढे सांगितले की, भारतीय विद्यार्थ्यांच्या परतण्याबाबत चीनने अद्याप कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नाही. बागची म्हणाले की, आम्ही चीनला भारतीय विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनुकूल भूमिका घेण्याचे आवाहन करणार आहोत की विद्यार्थ्यांना चीनमध्ये लवकर परतण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जावी.

    चीनमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय अहवालांवर विश्वास ठेवला तर चीनमध्ये सध्या कोरोनाचा संसर्ग पूर्वीपेक्षा वेगाने पसरत आहे. गेल्या दोन आठवड्यात चीनमध्ये 10 हजारहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहेत.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here