श्रीरामपुरात धूमस्टाईलने दोन महिलांच्या गंठणाची चोरी; गुन्हा दाखल

395

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरात धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील गंठण चोरीच्या दोन घटना घडल्या. यात दोन महिलांच्या गंठणाची चोरी झाली. शहर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील संगमनेररोडवरील रॉयल एनफिल्ड बुलेट शोरूम समोरून सोनाली जोशी (रा. बोरावके नगर, श्रीरामपूर) या अॅक्टिवा गाडीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या लाल रंगाच्या मोटरसायकलवरील दोघा अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील पंचवीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून चोरून नेले. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं. १५७ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत हिरा चंद्रभान शिंदे (रा. गुलमोहर हॉटेलमागे, श्रीरामपूर) या छत्रपती शिवाजी महाराज रोडवर नगरपरिषद हॉस्पिटल समोरून जात असताना दोन अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवरून येऊन त्यांच्या गळ्यातील ५७ हजार पाचशे रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावुन धूम ठोकली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुरनं. १५६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही घटनांचा श्रीरामपूर शहर पोलिसांकडून तपास सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here