दारूच्या नशेत अघोरी कृत्यातून पत्नीचा खून
नगर शहरानजीक जामखेड रोड येथील वैद्य कॉलनी घडलेल्या खून प्रकरणात माझे पत्नीवर जीवापाड प्रेम होते मात्र भीती दाखवण्यासाठी केलेल्या अघोरी कृत्यातून चुकून माझ्याकडून पत्नीचा खून झाला अशी धक्कादायक कबुली सदर प्रकरणातील आरोपी सुनील हिरामण वैराळ याने दिली आहे. त्याचा हा प्रकार पाहून पोलिस देखील अवाक झालेले असून तपास सुरू असल्याचे समजते. आरोपी सुनील वैराळ हा वडारवाडी ग्रामपंचायतीत पाणी सोडण्याचे काम करत होता. रात्री कामावरून तो परत आल्यानंतर त्याची पत्नी मंदा ही घरी स्वयंपाक करत होती त्यावेळी तो दारू पीत बसला होता. काही दारू त्याने आपल्या पत्नीला देखील दिली आणि दोघांनीही दारू पिल्यानंतर पत्नीने भाजी तयार केली मात्र सुनीलला यावेळी झोप लागली आणि काही वेळानंतर त्याला जाग आली तेव्हा पातेल्यात फक्त रस्ता शिल्लक राहिला होता म्हणून त्याने पत्नीला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र पत्नीने देखील मद्यप्राशन केले असल्यामुळे तिला जाग आली नाही. सुनील जवळ पडलेला लोखंडी वॉल तिला मारण्याची भीती दाखवू लागला आणि दोघांमध्ये चेष्टा मस्करी सुरू असतानाच सुनील त्याच्या हातातून तो निसटला आणि मंदा हिच्या डोक्यावर पडला आणि त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिला मारण्याचा आपला कोणताच इरादा नव्हता. दारूच्या नशेत आपल्याकडून खूप मोठी चूक झाली असून आरोपीने रडत चुकून दारूच्या नशेत आपल्याकडून हे घडले अशी कबुली दिली असल्याचे समजते.











