Mumbai Corona Update : मुंबईत गुरूवारी 73 रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 98 टक्के

558

Mumbai Corona Update :  मुंबईतील कोरोनारुग्णांच्या (Mumbai Corona Update) संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. आज नवे 73 रुग्ण आढळले आहे. मुंबई पालिका क्षेत्रात (BMC) आज एका मृत्यूची नोंद देखील झाली आहे.

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत नवे 73 कोरोनाबाधित आढळले असून 64 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या देखील कमी झाली असून आज ही संख्या 323 इतकी झाली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 98 टक्क्यांवर गेले आहे. आज नव्याने सापडलेल्या 73 रुग्णांपैकी 5 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 28 हजार 437 बेड्सपैकी केवळ  87 बेड सध्या वापरात आहेत.

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या (Corona Update) आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 229 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 395 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,22, 360 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 88, 40, 204 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. राज्यात आज  तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here