Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी कोरोनाबाधितांमध्ये घट, 157 रुग्णांची नोंद तर 298 कोरोनामुक्त

374

मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं चित्र असून आज राज्यात 157 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 298  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज एका  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,21, 220  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.09 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 7, 86, 83, 002   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

राज्यात सध्या 2382 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत  334  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात 217 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. 

देशात अजूनही दररोज कोरोना विषाणूच्या चार हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूचे 4 हजार 194 नवीन रुग्ण आढळले असून 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुरुवारी दिवसभरात कोरोनावर मात केलेल्या 6 हजार 208 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशात गेल्या 24 तासांत 2 हजार 503 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 27 जणांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 3116 नवे रुग्ण आढळले होते तर, 47 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तुलनेने आज रुग्णवाढ आणि मृत्यू कमी झाले आहेत. देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 36 हजार 168 वर पोहोचली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा दैनंदिन सकारात्मकतेचे प्रमाण 0.47 टक्के झाले आहे. दरम्यान, रविवारी दिवसभरात कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या 4377 जणांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे देशात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 4 कोटी 24 लाख 41 हजार 449 इतकी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here