मुंबई – गायनाच्या विशिष्ट शैलीने रसिकांच्या मनात घर करणाऱ्या बॉलिवूड सिंगर जुबीन नौटियाल आणि ‘कबीर सिंग’फेम अभिनेत्री निकिता दत्ता हे लवकरच विवाहबेडीत अडकणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.
विशेष म्हणजे, हे दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये असून, निकिता व जुबीन यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘मेरी रुह का थोडा हिस्सा पहाडो में छोड आयी हूँ’ या निकिताच्या पोस्टवर जुबीनने दिलेल्या ‘तुमने अपना दिल भी यहीं छोड़ दिया है ना’ असे उत्तर दिले आहे. त्यामुळे, त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चावर पूर्णविराम मिळत आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरीही लवकरच हे दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे.











