‘या’ ऐतिहासिक मैदानावर शेन वॉर्नला दिला जाणार अखेरचा निरोप; पंतप्रधान देखील राहणार उपस्थित

448

मुंबई – क्रिकेटचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्नचा (Shane Warne) थायलंड येथे वयाच्या 52 व्या वर्षी हार्ट अटॅक मुळे निधन झाले आहे.थायलंड पोलीसांनी त्याचा मृतदेह ऑस्ट्रेलियाला (Australia) पाठवला आहे.वॉर्नच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले.

वॉर्नचा थायलंडमधील कोह सामुई बेटावर शुक्रवारी मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह रविवारी सुरत ठाण्यात नेण्यात आला. त्यांचे पार्थिव रविवारी रात्री सुरत ठाणे येथून राजधानी बँकॉक येथे पोहोचले. येथून त्याला ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले.

तर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न क्रिकेट मैदानावर (MCG) वॉर्नला अंतिम निरोप देण्यात येणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार यावेळी एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनही उपस्थित राहणार आहेत.

वॉर्नचे मॅनेजर डॅनियल अँड्र्यूज यांनी बुधवारी ट्विट केले: वॉर्नीला निरोप देण्यासाठी MCG पेक्षा चांगली जागा जगात दुसरी नाही. येथेच त्याने 1994 च्या ऍशेसमध्ये हॅट्ट्रिक केली आणि 2006 मध्ये त्याच्या शेवटच्या आंतरराष्ट्रीय मालिकेतील बॉक्सिंग डे कसोटीत 700 वी कसोटी विकेट घेतली. वॉर्नचा जन्म मेलबर्नमध्ये झाला आणि इथेच वाढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here