दिल्ली – उत्तर प्रदेश निवडणुकी मध्ये भारतीय जनता पक्षाने समाजवादी पक्षाला धक्का देत पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करणार आहे. यूपीमध्ये भाजपने 273 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सपा 123 जागांवरच आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 1,02,399 मतांच्या फरकाने निवडणूक विधानसभा निवडणुक जिंकून एक मोठा विक्रम केला आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे संगीत सोम हे मेरठच्या सरधना मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. सपाचे अतुल प्रधान यांनी त्यांचा पराभव केला. संगीत सोम यांना विजयाची हॅट्ट्रिक करता आली नाही.
संगीत सोम यांनी याआधी दोनदा निवडणूक जिंकली होती, तर अतुल प्रधान दोनदा निवडणूक हरले होते. सरधना जागेवर सपाचा उमेदवार जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. विजयाचे अंतर सुमारे 18000 मतांचे आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे. मतमोजणीच्या चार फेऱ्या व्हायच्या आधी संगीत सोम यांनी मोदीपुरम येथील कृषी विद्यापीठातील मतमोजणीची जागा सोडली होती.











