मुंबई – बॉलिवुडची चर्चित अभिनेत्री पैकी एक असलेली अभिनेत्री जिनिलियाने देशमुख नेहमी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहते. ती तिच्या फॅन्ससाठी नेहमी सोशल मीडियावर फोटो किंवा व्हिडिओ टाकत असते. नुकताच तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे.
ती आता लवकरच पुन्हा एकदा एका दाक्षिणात्य चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक करणार आहे. तिने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.
जिनिलियाने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या आगामी चित्रपटाच्या लूकमधील काही फोटो पोस्ट केले आहेत. यात जिनिलियाने सुंदर लेहंगा परिधान केला आहे. त्यासोबत तिने नवीन हेअरस्टाईलही केली आहे. यात जिनिलिया ही फारच गोड दिसत आहे. हे फोटो शेअर करतेवेळी तिने तिच्या चाहत्यांना याबाबतची माहिती दिली आहे.
आज मी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये पुन:प्रवेश केला. ही एक जागा आहे जी घरापासून दूर असली तरी ती घराप्रमाणेच आहे. या विशेष भागासाठी माझा विचार केल्याबद्दल धन्यवाद. मी तुमचे खूप खूप आभार मानते. त्यासोबतच मी किर्ती रेड्डी यांनाही त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाबद्दल शुभेच्छा देते. तुमच्या पहिल्या चित्रपटाचा मी एक भाग असल्याचा मला आनंद आहे”, असे कॅप्शन जिनिलियाने दिले आहे.
जिनिलियाने तिच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यानंतर आता जिनिलिया ही एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कर्नाटकचे माजी मंत्री आणि लोकप्रिय उद्योगपती गली जनार्दन रेड्डी यांचा मुलगा किर्ती झळकणार आहे. हा एक तेलुगु-कन्नड द्विभाषिक चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन राधाकृष्ण यांनी केले आहे.










