‘त्या’ प्रकरणात तिघा भावांना चार दिवस पोलीस कोठडी

351

अहमदनगर- तलवार, कुऱ्हाड व लाकडी दांडक्याने तरुणावर हल्ला करणाऱ्या तिघा भावांना न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे. गुरुवारी त्यांना तोफखाना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले होते. सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे (सर्व रा. नालेगाव, अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपी भावांची नावे आहेत.

त्यांनी सोमवारी रात्री नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय ३२ रा. माळीवाडा, अहमदनगर) या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. जखमी अनिलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

त्याने उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाच जणांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील दीपक देठे व त्याची पत्नी अद्यापही पसार आहेत. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here