CISCE Exam: दहावीच्या पेपरच्या तारखा बदलल्या; गणित, भूगोल आणि हे पेपर आता ‘या’ तारखांना होणार

394

नवी दिल्ली: कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशनने (CISCE) दहावीच्या दुसऱ्या सेमीस्टरच्या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल केला आहे. या नव्या वेळापत्रकानुसार, गणित आणि भूगोलच्या पेपरची तारीख बदलली असून ती अनुक्रमे 2 मे आणि 4 मे रोजी घेण्यात येणार आहे. यापूर्वी हे दोन पेपर हे 3 मे आणि 5 मे रोजी घेण्यात येणार होते. CISCE चे नवीन वेळापत्रक हे cisce.org या अधिकृत साईटवर पहायला मिळेल. 

कोणत्या पेपर्सची तारीख बदलली? नवीन वेळापत्रकानुसार, गणिताचा पेपर हा 2 मे, भूगोलचा पेपर हा 4 मे, फिजिक्सचा पेपर 9 मे तर बायोलॉजीचा पेपर हा 17 मे रोजी घेण्यात येणार आहे. 

दहावी आणि बारावीच्या परीक्षा या 25 एप्रिल ते 6 जून या दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. दहावीचे पेपर हे सकाळी 11 ते 12.30 या वेळेत तर बारावीचे पेपर हे दुपारी 2 ते 3.30 या वेळेत होणार आहेत. 

कौन्सिल फॉर द इंडियन स्कुल सर्टिफिकेट एक्झामिनेशन बोर्डने हे नवीन वेळापत्रक आज जाहीर केल आहे. पण या परीक्षांच्या तारखांमध्ये बदल का करण्यात आला आहे याचे कारण मात्र त्यांनी दिलं नाही. 

बारावीच्या परीक्षांमध्ये बदल नाहीदरम्यान बारावीच्या पेपरच्या तारखांमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here