- मुंबई : आजपासून विधिमंडळ अधिवेशन चालू झाले आहे. आणि राज्य सरकार (State Government) व भाजपमध्ये (Bjp) पहिल्याच दिवशी चांगली जुंपली आहे.
- यावेळी भाजपने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्याचा मुद्दा घेऊन महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.
- याप्रसंगी भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी की खंडणी दोन वेळा देण्यात आली आहे. त्यामुळे अतिरेक्यांशी संबंध जोडून ईडी (ED) जर मंत्री नवाब मलिक यांना अटक करू शकते.
- तर तोच न्याय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनाही लावण्यात यावा, अशी मागणी भाजप माजी आमदाराने इडीकडे केली आहे.
- त्यामुळे भाजपचे माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी आज मुंबई (Mumbai) येथील ईडी कार्यालय जाऊन भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
- तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, आज तक्रार दिल्यानंतर मी ८ दिवस वाट पाहणार आहे. त्यानंतर मी दर मंगळवारी भाजपच्या एकेक नेत्याच्या विरोधात ईडीकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करणार असल्याचा इशारा गोटे यांनी दिला आहे.
- दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले. त्यानंतर २०१४-१५ मुंबई बाॅम्ब ब्लास्ट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची याच्याशी संबंधित असलेल्या कंपनीच्या खात्यातून भारतीय जनता पक्षाला १० कोटींची देणगी देण्यात आली असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला आहे.
Home महाराष्ट्र मुंबई बाॅम्ब ब्लास्ट खटल्यातील मुख्य आरोपी इक्बाल मिरची याच्याशी संबंधित असलेल्या कंपनीच्या...





