Baba Vanga Prediction: पुतिन संपूर्ण जगावर राज्य करतील, बाबा वँगा यांनी रशियासंदर्भात केली होती अशी भविष्यवाणी!

438

नाटोमध्ये सामील होण्याच्या मुद्द्यावरून रशिया आणि युक्रेन  यांच्यात भयावह युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि नाटो देशांच्या धमक्यांची कसलीही परवा न करता रशियन सैन्याने युक्रेनच्या सर्वच भागांवर हल्ले सुरू केले आहेत. महत्वाचे म्हणजे, या युद्धात संपूर्ण जग रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची दादागिरी पाहत आहे. (Baba Vanga Prediction)

बदललेल्या जागतिक परिस्थितीत, आता रशिया जगाचा नवा सम्राट होणार? अमेरिका आणि युरोपचे वर्चस्व संपणार? अशी चर्चा जगभर सुरू आहे. तसेच, रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू असतानाच, बाबा वँगा यांच्या भविष्यवाणीचीही चर्चा जोर धरू लागली आहे. या भविष्यवाणीवर विश्वास ठेवल्यास, युक्रेन युद्धानंतर पुतिन जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनणार आहेत आणि रशिया जगावर राज्य करेल.

भविष्यात रशिया जगावर राज्य करेल आणि युरोपचे रुपांतर ओसाड जमिनीत होईल, असे बाबा वँगा यांनी म्हटले होते. एवढेच नाही, तर ‘सर्व काही बर्फासारखे वितळेल. केवळ एका गोष्टीला कुणी स्पर्षही करू शकणार नाही, ती म्हणजे व्लादिमीर आणि रशियाची शान. रशियाला कुणीही रोखू शकणार नाही.’ रशिया आपल्या मार्गातून सर्वांना बाजूला सारेल आणि जगावर राज्य करेल, असेही बाबा वँगा यांनी म्हटले होते.”

‘बाल्कनचा नॉस्ट्राडेमस’ म्हणून ओळखल्या जाणारा दृष्टीहीन बाबा वँगा यांनी 2022 वर्षासाठी केलेल्या भाकितांनी इंटरनेट जगतात खळबळ उडाली आहे. यापूर्वी त्यांनी 9/11 चा हल्ला आणि ब्रेक्झिट संकटाची अचूक भविष्यवाणी केली होती. सोव्हिएत युनियनचे विघटन, 2001 मधील 11 सप्टेंबरचा हल्ला, प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि चेरनोबिल आपत्ती संदर्भातील त्यांचे दावे सत्य सिद्ध झाले आहेत.

वयाच्या 12 व्या वर्षीच वँगेलिया पांडव गुस्टेरोवा यांनी आपली दृष्टी गमावली. आपल्याला भविष्याकडे बघण्यासाठी देवाकडून ही एक देणगी मिळाली असल्याचा दावा त्यांनी केला होता. 1996 मध्ये वयाच्या 85 व्या वर्षी मृत्यूपूर्वी त्यांनी 2022 संदर्भात धक्कादायक भविष्यवाणी केली होती. असे म्हटले जाते, की बाबा वेंगा यांनी केलेल्या जवळपास 85 टक्के भविष्यवाण्या सत्य सिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये 5079 पर्यंतचा उल्लेख आढळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here