तेलंगणामध्ये विमान कोसळल्याने एका महिला वैमानिकाचा मृत्यू

338

मुंबई – तेलंगणा राज्यातील नालगोंडा जिल्ह्यात आज सकाळी अकराच्या सुमारास एक विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनांमध्ये एका महिला वैमानिकाचं मृत्यू झाला आहे. महीमा गजराज असे मयत महिला वैमानिकाचं नाव आहे.ही महिला वैमानिक चेन्नईमधील रहिवासी असून हैदराबादमधील फ्लायटेक एव्हिएशन अकॅडमीत प्रशिक्षण घेत होती.

समोर आलेल्या माहितीनुसार प्रशिक्षण घेत असलेली महिला वैमानिक सकाळी साडेदहाच्या सुमारास सिस्ना १५२ या विमानासह नालगोंडातून उड्डान केलं. १० वाजून ५० मिनिटांनी या विमानाचा अपघात झाला.

विमान दुर्घटना कशामुळे?
हवेत उच्चदाबाच्या विद्युतवाहिनी तारांना धडक झाल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे. यानंतर विमान कोसळलं. या परिसरात सर्वत्र विमानाचे अवशेष पाहायला मिळत आहेत. या विमानाला दोन सीट असल्याने प्रथमदर्शनी विमानात दोन लोक असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, नंतर विमानात एकच वैमानिक असल्याचं समोर आलं.

या अपघाताबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले, “नालगोंडामधील प्रशिक्षण देणाऱ्या विमान अपघाताची बातमी ऐकून धक्का बसला. तपास पथक घटनास्थळावर पोहचलं आहे. दुर्दैवाने आपण प्रशिक्षणार्थी महिला वैमानिकाला गमावलं आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या सहवेदना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here