शहरात दोन चंदनतस्करांना अटक; तब्बल 18 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

395

अहमदनगर – शहरात कोतवाली पोलिसांनी कारवाई करत तब्बल 18 लाख 96 हजार 890 रुपयांचा मुद्देमालासह दोन चंदनतस्करांना अटक केली आहे.कोतवाली पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

चंदनाचे वृक्ष बेकायदेशीर तोडून चोरून आणलेल्या चंदनाचे लाकडाचे तुकडे हे इनोव्हा गाडीमध्ये भरून विक्री करण्यासाठी नगर शहरातून जाणार आहेत व आता जावून सापळा रचला तर ते मिळून येईल अशी माहिती संपतराव शिंदे यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे संपतराव शिंदे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार यांना सदर ठिकाणी सापळा लावून कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले.
या आदेशानुसार पथकाने चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफिस कडे जाणारे रोडवर सैनिक लॉन गेट समोरच्या परीसरात रात्री 3.30 च्या सुमारास करवाई करुन
सुभाष भिमराज दिलवाले आणि राजेंद्र रंगनाथ सासवडे यांना अटक करुन त्यांच्याजवळ असणारा 18 लाख 96 हजार 890 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

मुद्देमालासह आरोपी मिळून आल्याने आरोपींना अटक करण्यात आली आहे व त्याचे विरोधात पोना/योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हा गणेश धोत्रे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here