- ??मंत्री नवाब मलिकांना 3 मार्चपर्यंत ईडीची कस्टडी, सत्र न्यायालयाचा निर्णय; मनी लॉंड्रिंग प्रकरणी काल तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ईडीने केली अटक
- ?? 10 वी 12 वीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोमधील प्रश्नपत्रिका जळून खाक; अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात टेम्पोला अचानक आग
- ??मला जबरदस्तीने अटक करून ईडी कार्यालयात आणलं गेलं आणि या प्रकरणी कोणताही समन्स न देता कारवाई केली; मंत्री नबाब मलिकांकडून न्यायालयात युक्तीवाद
- ??भारत-श्रीलंका ट्वेन्टी-20 मालिका : भारत-श्रीलंका यांच्यात आज पहिला ट्वेन्टी-20 सामना; जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजाचे पुनरागमन, रवी बिष्णोई बाहेर बसण्याची शक्यता
- ?? ‘भारतपे’ चे सह-संस्थापक अशनीर ग्रोव्हर यांच्या पत्नी माधुरी जैन-ग्रोव्हर यांची कंपनीतून हकालपट्टी, आर्थिक अनियमिततेच्या कारणावरून आल्या होत्या अडचणीत
- ?? कोरोना काळात लाखो महिलांना घरगुती हिंसाचाराचा करावा लागला सामना, जगात घरगुती हिंसाचाराच्या घटनांत 25 टक्के वाढ; ‘लॅन्सेट’ या नियतकालिकाचा शोधनिबंध प्रकाशित
- ?? रितेश देशमुख एमएक्स टकाटकवर बॉलिवूड-स्टाईल एन्ट्री करणार, एमएक्स टकाटकवर देखील व्हिडीओ शेअर करून करणार चाहत्यांचं मनोरंजन
- ?? भारतातील भारतीय 9 पर्यटनस्थळांत महाराष्ट्रातील एकमेव सिंधुदुर्गचा समावेश; जगातील 30 सर्वात सुंदर पर्यटनस्थळांची कोंड नेस्ट ट्रॅव्हलर मॅगझिनकडून यादी जाहीर
- ??*Maharashtra Corona Update :* राज्यात बुधवारी 1 हजार 151 नव्या रुग्णांची भर, 2 हजार 594 रुग्ण कोरोनामुक्त; राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के