मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असून राज्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1151 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 594 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यातील पाच महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही तर 29 महानगपालिकांमध्ये कोरोनाची एकेरी संख्येची नोंद झाली आहे. तर 47 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.
राज्यात आज एकही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4345 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 164 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 23 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77 लाख 2 हजार 217 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.97 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 64 हजार 050 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 922 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 74 लाख 84 हजार 114 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
मुंबईत कमी होणारी रुग्णसंख्या सोमवारनंतर मंगळवारी काहीशी वाढल्याचं पाहायला मिळालं. आजही रुग्णसंख्येत काहीसा चढ पाहायला मिळाला आहे. मागील 24 तासांत 168 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मंगळवारी हीच रुग्णसंख्या 135 होती. दरम्यान आज 255 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.





