7 मार्चला मविआ सरकार पडेल; चंद्रकांत पाटलांचा नवीन भविष्यवाणी

1333

मुंबई – राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडी सरकार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा मतदान 7 मार्च रोजी झाले की पडणार असल्याची नवीन भविष्यवाणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारचे नेते रांगेत आहेत. काही जात्यात गेले तर काही सुपात आहेत. कोठड्या तयार आहेत. उत्तर प्रदेशात सात मार्च रोजी शेवटचे मतदान झाले की, बहुधा कारवाई सुरू होईल. त्यातून पळता भुई थोडी होईल व त्यातून हे सरकार पडेल, असे आपले विश्लेषण आहे. असा अंदाज सामान्य माणूसही बांधू शकतो.

यावेळी चंद्रकांत पाटलांना दिशा सालियानच्या मृत्यूचे राजकारण होत असल्याच्या आरोपाबाबत विचारणा करण्यात आली. यावर ते म्हणाले, याबाबतीत काहीही राजकारण होत नाही. सात मार्चनंतर सगळे पुरावे बाहेर येतील. ‘दूध का दूध, पानी का पानी होईल’, कोण गुंतले आहे आणि कोणाला तुरुंगात जावे लागेल हे स्पष्ट होईल. सध्या त्यामुळेच उसने अवसान आणून शिवराळ भाषा वापरणे चालू आहे. दिवा विझण्यापूर्वी फडफडतो तसा हा प्रकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here