- उन्हाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. डास चावल्यास डेंग्यू, मलेरियासारखे आजार होतात. डासांपासून वाचण्यासाठी अनेक जण क्वाॅईल किंवा लिक्विड रिफिल वापरतात.. मात्र, त्याचा मानवी शरीरावरही परिणाम होतो.
- अशा वेळी डासांपासून बचावासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. या नैसर्गिक उपायांबाबत जाणून घेऊ या…!
- *निलगिरी तेल* : दिवसा डास चावत असल्यास निलगिरीचे तेल वापरा. निलगिरी तेलात सम प्रमाणात लिंबू पिळून हे तेल अंगाला लावा. त्याच्या वासामुळे डास पळून जातील.
- *लसूण* : लसणाचा वास डासांना सहन होत नाही.. त्यासाठी लसूण बारीक चिरुन पाण्यात उकळवा. हे पाणी घरात शिंपडल्यास डास येत नाहीत.
- *कापूर* : घरात कापूर जाळून टाका. सुमारे 15-20 मिनिटे तसाच राहू द्या. त्यामुळे डास लगेच पळून जातील.
- *लॅव्हेंडर* : लॅव्हेंडरचा सुगंध खूप डार्क आहे. त्यामुळे डास घरात येत नाहीत. तुम्ही लॅव्हेंडर रूम फ्रेशनरही वापरु शकता.
- *कडुलिंबाचे तेल* : कडुलिंब व खोबरेल तेल मिसळून ते अंगाला लावा. त्यामुळे सुमारे आठ तास डास तुमच्याजवळ येणार नाहीत.