दोघांच्या संमतीनं केलेलं सेक्स बलात्कार ठरु शकतो का?; न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय

दोघांच्या संमतीनं केलेलं सेक्स बलात्कार ठरु शकतो का?; न्यायालयानं दिला महत्त्वपूर्ण निर्णय

नागपूर | प्रेम, शारिरीक संबंध, लग्न, बलात्कार, अशा अनेक गोष्टी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या पहायला मिळतात. लग्नाचं आमिष देऊन बलात्कार केल्याच्या कित्येक घटना पाहिल्या मिळाल्या आहेत.अशातच आता यावर निर्वाळा नागपूर सत्र न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

प्रेमसंबंधात दुरावा, कटूता आल्यानं महिलांकडून अनेकदा लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारी दाखल केल्या जातात.

त्यामुळे आता याविषयी निर्वाळा नागपूर सत्र न्यायालयानं निर्णय दिला आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं असल्याचं पहायला मिळत आहे

.परस्पर सहमतीनं शारीरिक संबंधांच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टानं महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. सज्ञान महिलेनं स्वत:च्या मर्जीने शरीरसंबंध ठेवल्यास संबंधित पुरुषास बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं जाऊ शकतं नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल न्यायालयाने यावेळी दिला आहे.

दरम्यान, सागर चुन्नीलाल दडुरे असं संबंधित आरोपीचं नाव आहे. शिक्षण सुरू असताना सागरची ओळख फिर्यादी मुलीसोबत झाली. नजदिकच्या काळात दोघांनी अनेकदा शरीरसंबंध ठेवले.

मात्र सागर यानं कुटुंबाच्या विरोधामुळे फिर्यादी मुलीशी विवाह करण्यास नकार दिला.

हा खटला नागपूर सत्र न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने आरोपी तरुणाची निर्दोष सुटका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here