मुंबई – बिहारचा क्रिकेटपटू साकिबुल गनी याने रणजी ट्रॉफीमधील आपल्या पहिल्याच सामन्यात त्रिशतक झळकावले आहे. आपल्या पहिल्याच सामन्यात शतक झळकवणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
कोलकात्यात मिझोरामविरुद्ध खेळलेली त्याची खेळी ही प्रथम श्रेणी क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात कोणत्याही फलंदाजाने नोंदवलेली जगातील सर्वोच्च धावसंख्या आहे. त्याचे त्रिशतक अवघ्या 387 चेंडूत झाले आहे. या खेळीत त्याने 50 चौकार मारले आहेत. साकिबुल गनीच्या या कामगिरीबद्दल त्याच्या कुटुंबीयांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याआधी हा विक्रम अजय रोहराच्या नावावर प्रथम श्रेणी पदार्पणात नोंदवला गेला होता. त्याने नाबाद 267 धावा केल्या होत्या. साकिबुलने हा मोठा विक्रम त्याला मागे टाकून केला आहे. एकूण 71 धावांवर बिहारच्या 3 विकेट पडल्या असताना तो फलंदाजीला आला. त्यानंतर जे घडले ते इतिहासाच्या पानात नोंदवले गेले आहे











