- *राहुरी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणूकात प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांच्या पाठीशी पूर्ण ताकदिनीशी उभा राहणार असल्याचे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी व्यक्त केले. तालुक्यातील बारागांव नांदूर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या उद्घाटन प्रसंगी श्री. सुरेशराव लांबे पा. हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नजीरभाई काकर हे होते.
- यावेळी राहुरी तालुका उपाध्यक्षपदी इन्नूस जब्बार देशमुख, तालुका अल्पसंख्यांक अध्यक्षपदी फैजान अब्दुल कादर देशमुख, शाखाध्यक्ष आसिफ शेख, बारागांव नांदूर गट प्रमुख विकास ससाणे आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
- यावेळी बोलताना श्री. लांबे म्हणाले, राहुरी विधानसभा मतदारसंघातील सामाजिक कामे करण्यात प्रहार सैनिक नेहमी अग्रेसर राहतील. सर्वसामान्य, गोरगरीब, वृद्ध, अल्पसंख्यांक, दिव्यांग, शेतकरी, शेतमजूर, कामगार, प्रकल्पग्रस्त यांचे विविध प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल. प्रहार सैनिकांनी कोणच्याही थापा व दादागिरीला बळी पडू नये. त्यांच्यामागे पक्ष भक्कमपणे पाठीशी उभा राहील. तसेच गावागावात प्रहारच्या शाखा उघडणार असल्याचे सांगितले. यावेळी श्री. लांबे यांच्या हस्ते बारागांव नांदूूर नूतन शाखेच्या फलकाचे फित कापून अनावरण करण्यात आले. यावेळी विक्रमकुमार गाढे, मच्छिंद्र सर, सलीमभाई काकर, पै.नजीरभाई काकर, एम. आझाद सोशल क्लबचे रईसभाई शेख आदींनी मनोगत व्यक्त केले.
- कार्यक्रमास उमरभाई शेख, शाकीरभाई पठाण, अमजदभाई पठाण, भास्करराव कोहकडे, संदीप गाडे, सोपान गाडे, अशोक गाडे, मुनाफभाई देशमुख, जाकीरभाई सय्यद, राजुभाई इनामदार, वाजीद पिरजादे, इरफान सय्यद, हबीबभाई देशमुख, आमीनभाई काकर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी इन्नूस शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले.





