मुंबई – शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाचे नेते किरीट सोमय्या तसेच ईडी यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे.
राऊत यांनी केलेल्या आरोपानंतर विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणीस यांनी ट्विटरवर ट्विट करत संजय राऊत वर खोचक निशाणा साधला आहे.
अमृता फडणवीसांनी संजय राऊतांचं थेट नाव न घेता त्यांच्यावर खोचक निशाणा साधला आहे. “आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं असून त्यावर प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत. अमृता फडणीस यांनी केलेल्या टीकेला आता संजय राऊत काय उत्तर देणार हे पाहावे लागेल.











