- बदलती जीवनशैली, चुकीचा आहार नि ताण-तणावामुळे अनेकांची रात्रीची झोप उडाली आहे. चांगल्या आरोग्यासाठी किमान 7 ते 8 तास झोपण्याची गरज असते. मात्र, अनेकांना रात्री उशिरापर्यंत झोप येत नाही. त्यामुळे सकाळी थकवा जाणवणे, डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात.
- अनेकांना दिवसा झोपण्याची सवय असते. काही जण रात्री अंधारात कॉम्प्युटर वा मोबाईल पाहत बसतात. त्याच्या प्रकाशामुळे तुमची झोप कमी होते.
- *असा घ्या आहार..!*
- शांत झोप येण्यासाठी रात्रीच्या आहारात ‘कार्बोहायड्रेट्स’युक्त पदार्थांचं सेवन करावं. झोपण्यापूर्वी किमान 4 तास आधी ‘कर्बोदक’युक्त पदार्थ खावीत. उदा. व्हाईट राईस, व्हाईट ब्रेड, अननस, टरबूज, कुकीज, केक्स, बटाटे.
- *झोपेसाठी उपाय*
- ▪️ दिवसा जास्त वेळ झोपू नका, कारण त्यामुळे तुम्हाला रात्री झोपणे कठीण होईल. अगदीच गरज वाटत असेल, तर दिवसा फक्त अर्धा तास झोप घ्या.
- ▪️ खोलीचे तापमान 15 अंश डिग्री सेल्सिअस असावं.. जास्त तापमानामुळे वेळेवर झोपायला त्रास होऊ शकतो. शरीरातील उष्णताही वाढते.
- ▪️ झोपताना वारंवार घड्याळाकडे पाहण्याची अनेकांना सवय असते. तसे केल्याने तणाव वाढतो व झोप कमी होते.





