punjab Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या पंजाब दौरा, संयुक्त किसान मोर्चाचा पुन्हा विरोध 

572

Punjab Election 2022: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात निवडणुका होत आहेत. राजकीय नेते या निवडणुकांच्या निमित्ताने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi)  हे उद्या सोमवार पंजाबमध्ये प्रचारासाठी दौरा करणार आहेत. एका बाजूला भाजपची तयारी तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या विरोधाला भाजपला सामोर जावं लागणार  आहे. पंजाबमध्ये मतं मिळवण्यासाठी भाजपनं पंतप्रधान मोदींच्या तीन रॅलींचे आयोजन केले आहे.

शेतकरी संघटनांच्या विरोधामुळे पंतप्रधान मोदी 5 जानेवारीला फिरोजपूर येथे होणाऱ्या सभेला उपस्थित राहू शकले नव्हते. शेतकर्‍यांनी त्यांचा काफिला वाटेत अडवला होता. त्यानंतर हा वाद आणखी वाढला होता. 8 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी पहिली व्हर्च्युअल रॅली घेतली होती. मात्र, नरेंद्र मोदी पुन्हा उद्या पंजाबच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या पंजाब दौऱ्याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विरोधाला नेमके कसे सामोरे जायचे हा प्रश्न भाजपसमोर असणार आहे.

हमीभावाचे आश्वासन, लखीमपूर हिंसाचार प्रकरणी भाजप नेते अजय मिश्रा टेनी यांच्यावर कोणतीही कारवाई न करणे आणि मुलगा आशिष मिश्रा यांना जामीन मिळाल्याचा विरोध  शेतकरी करत आहेत. यावेळी पंतप्रधानांच्या सभेत कोणतीही अडचण येणार नाही, अशी भाजपला आशा आहे. यावेळी भाजपने पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या तीन सभांचे नियोजन केले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 14  फेब्रुवारीला जालंधर येथे पहिला जाहीर सभा घेणार आहेत.16 फेब्रुवारीला दुसरी जाहीर सभा ते पठानकोट येथे घेतील 17 फेब्रुवारीला ते अबोहर याठिकाणी जाहीर सभा घेतील

या तीन सभांच्या माध्यमातून नरेंद्र मोदी पंजाबमधील राजकीय वातावरण बदलण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण, काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपने पंजाबमध्ये रणणिती आखली आहे. मात्र, पंजाबमध्ये भाजपला शेतकऱ्यांचा मोठा विरोध होताना दिसत आहे. दरम्यान, पंजाबमधील 117 जागांवर भाजप यावेळी 65 जागा लढवत आहे. तर मित्रपक्ष असलेल्या अमरिंदर सिंह यांचा पंजाब लोक काँग्रेस 37 जागांवर निवडणूक लढवत आहे. सुखदेव सिंह धिंडसा यांचा शिरोमणी अकाली दल (युनायटेड) ही 15 जागांवर निवडणूक लढवत आहे. या 117 जागांवर भाजपला आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी पंतप्रधान मोदींवर आहे. पंजाबमध्ये 20 फेब्रुवारीला मतदान होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here